23.1 C
New York

Remal Cyclone : रेमाल चक्रीवादळाचा कहर; आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू

Published:

तीव्र चक्रीवादळ ‘रेमाल’ बांगलादेशच्या किनारपट्टीवर जोरदार वारा आणि मुसळधार पावसासह धडकलेलं आहे. (Cyclone) हे चक्रीवादळ सागर बेट, पश्चिम बंगाल-खेपुपारा, बांगलादेश किनारपट्टी (सुंदरवन कोस्ट) वर धडकलं आहे. (Remal Cyclone ) दरम्यान, हे रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत. (Rain) तसंच, आपत्तीमध्ये 36 लोकांचा मृत्यू झालाय. तर, 10 पेक्षा अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

Remal Cyclone जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत

या वादळामुळे जो भाग बाधित झाला आहे त्या भागात रस्ते आणि रेल्वे संपर्क करण्यात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर येथील दैनंदिन जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. या चक्रीवादळाचा मिझोरामला सर्वात जास्त फटका बसला आहे, जिथे 29 लोकांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये ऐझॉल जिल्ह्यातील खाण कोसळून झालेल्या कामगारांच्या मृत्यूंचाही समावेश आहे. तसंच, नागालँडमध्ये चार, आसाममध्ये तीन आणि मेघालयमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

अखेर मान्सून केरळात दाखल हवामान विभागाची घोषणा

Remal Cyclone 750 लोक बेघर

वादळी वाऱ्यासह संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांव्यतिरिक्त, झाडं उन्मळून पडली आणि वीज आणि इंटरनेट सारख्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये गेल्या 24 तासांत 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारं वाहत असताना जोरदार पाऊस झाला असून यामध्ये सुमारे 470 घरांचं नुकसान झालं आहे. तर, 750 लोक बेघर झाले आहेत. यामध्ये बेघर झालेल्या लोकांपुढे आता राहायचं कुठं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Remal Cyclone मेघालयसाठी 2 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट

हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याना त्याचा अंदाज सध्या ईशान्येकडील राज्यांसाठी जास्त गंभीर श्रेणीत येतोय. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये संपूर्ण आठवडाभर जोरदार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट राहील असा अंजाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आसाम आणि मेघालयसाठी 2 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img