8.9 C
New York

ICC Rankings : टीम इंडियाच अव्वल!

Published:

टी 20 विश्वचषकाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC Ranking) रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार टीम इंडियाने टी 20 रँकिंगमध्ये (Team India) अव्वल क्रमांक कायम राखला आहे. 264 गुणांसह भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा वेस्टइंडिजने मात्र मोठा उलटफेर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची (T20 World Cup 2024) मालिका जिंकत वेस्टइंडिज चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) शानदार विजय मिळाल्याचा फायदा विंडीज संघाला झाला आहे. टी20 रँकिंग मध्ये वेस्ट इंडीज संघाने मोठी झेप घेतली आहे. वेस्टइंडिजचा संघ आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी 20 सामन्याची मालिका आयोजित करण्यात आली होती. या तिन्ही सामन्यांत विंडीज संघाने विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर वेस्ट इंडिज संघ टी 20 संघांच्या यादीत पुढे निघाला आहे.

आजपासून मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक

भारतात आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच ही मालिका देखील सुरू होती. यामुळे संघातील मुख्य खेळाडू नव्हते तरी देखील वेस्टइंडीजने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले. या विजयानंतर वेस्टइंडीज टी 20 रँकिंगमध्ये 254 रँकिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आली आहे. टीम इंडिया 264 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर 257 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि 254 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चांगल्या प्रदर्शनाचा फायदा संघातील खेळाडूंनाही झाला आहे. संघाचा कार्यवाहक कर्णधार ब्रँडन किंग आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जॉन्सन चार्ल्स याला या मालिकेत प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार मिळाला. त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर टी 20 रँकिंगमध्ये तो विसाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मालिका विजयाचा वेस्टइंडिजच्या खेळाडूंनाही मोठा फायदा झाला आहे.

ICC Ranking टॉप ५ मधून पाकिस्तान बाहेर

आयसीसीने जारी केलेल्या संघाच्या क्रमवारीत पाकिस्तानाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या पाच संघांच्या यादीत पाकिस्तान (Pakistan Cricket) नाही. 244 गुणांसह पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. 244 गुणांसह दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर आहे. वेस्टइंडिज विरोधात तीन सामन्यांची मालिका गमावल्याने रँकिंगमध्ये आफ्रिकेला फटका बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img