23.1 C
New York

T-20 World Cup : आयपीएलचा ताण ऑस्ट्रेलियन संघाला भोवला – सुभाष हरचेकर

Published:


आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट (T-20 World Cup) स्पर्धेचा पहिला सामना केवळ आठ दिवसांवर आला असताना ऑस्ट्रेलियन संघाला (Team Australia) पहिला सराव सामना केवळ नऊ खेळाडूंसह खेळावा लागला, ही बाब नक्कीच चिंतेची आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणांच्या तक्त्यात पहिल्या चार संघांत येईल, अशी शक्यता अनेक दिग्गजानी वर्तवली आहे.

कर्णधार मिचेल मार्शच्या संघाचा पहिला सामना ओमानशी सहा जून रोजी आहे. प्रथेप्रमाणे सहभागी होणाऱ्या संघाना सराव सामने खेळण्याची संधी मिळते. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना नामिबीयाशी २९ मे रोजी खेळला गेला. पण या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू अद्याप अमेरीकेत दाखल झाले नसल्यामुळे संघाच्या प्रशिक्षकाना खेळाडूंचे कपडे घालून मैदानात उतरावे लागले.

T-20 World Cup : आयपीएलमध्ये सहासष्ठ दिवसात चौऱ्याहत्तर सामने

ट्रेविस हेड, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टाईनिस, मिचेल मार्श आणि कॅमेरून ग्रीन हे सहा खेळाडू आयपीएलमध्ये खेळल्यामुळे त्यानी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलपाठोपाठ आयसीसी टी- २० विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे खेळाडूना प्रतिष्ठेच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पुरेशी विश्रांती घेता येणार नाही. सहासष्ठ दिवसात साखळीचे सत्तर आणि प्लेऑफचे चार असे एकूण चौऱ्याहत्तर सामने सातत्याने खेळत असल्यामुळे खेळाडूंच्या तंदुरूस्तीवर परिणाम होणे साहजिकच आहे. पण, आयपीएलमुळे करोडो रूपयांची कमाई होत असल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूनी देशाच्या सामन्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा : मराठवाड्यात कुणाची हवा?

T-20 World Cup : प्रशिक्षक पॅड बांधून उतरले मैदानात

इंग्लंडच्या खेळाडूनी मात्र प्लेऑफचे सामने सोडून ते देशाच्या सामन्यांसाठी मायदेशी परतले. नामिबिया विरूद्ध ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनावर अशी पाळी आली की, मिचेल मार्श आणि तेज गोलंदाज जोश हेझलवूड सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्यामुळे एक वेळ अशी आली की, निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेले क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ॲन्ड्रे बोरोवेक, मुख्य प्रशिक्षक ॲन्ड्रे मॅकडोनाल्ड आणि फलंदाजीचे प्रशिक्षक ब्रॅड हॉग याना मैदानात उतरावे लागले.

T-20 World Cup : विराटही अजून मायदेशातच

भारताचा माजी कर्णधार आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधीक धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहलीही अद्याप अमेरीकेत दाखल झालेला नाही. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलेल्या खेळाडूनी आयपीएलमध्ये अखेरपर्यंत खेळण्याला अधिक महत्व देऊन विश्वचषक स्पर्धेला दुय्यम स्थान दिले आहे, असे वाटते. ही बाब नक्कीच संबंधीत देशाच्या क्रिकेट मंडळाला शोभनीय नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img