3.6 C
New York

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजपासून ध्यान

Published:

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) कन्याकुमारीला (Kanyakumari) रवाना झाले आहेत. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. तोपर्यंत मोदी कन्याकुमारी येथे ध्यानाला (Meditation) बसणार आहेत.

पंतप्रधान मोदी २०१९ च्या निवडणुकीनंतरही हिमालयात ध्यान करण्यासाठी गेले होते. यावेळी मोदी यांनी आपण मतदान संपताच ध्यानाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे ज्या ठिकाणी ध्यानधारणा करत होते, त्याच जागेवर ध्यानाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मोदी गुरुवारी कन्याकुमारी येथे दाखल झाले. सायंकाळी त्यांनी येथील अम्मन मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर ते सलग ४८ तास ध्यानाला बसले.
१ जून रोजी लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान संपणार आहे. मोदी १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img