26.6 C
New York

Monsoon : अखेर मान्सून केरळात दाखल हवामान विभागाची घोषणा

Published:

मुंबई

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहेत. पण आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. मान्सूननं केरळ (Kerala Monsoon) आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिली आहे. हवामान विभागानं (India Meteorological Department) यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.

उन्हाळ्याने त्रस्त झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. आज भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट दिली असून केरळमध्ये मान्सून धडकल्याची घोषणा केली आहे. १ जूनही मान्सूनच्या आगमनाची तारीख असते, मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री झाल्याने बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img