4.1 C
New York

Mega Block : आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवरील ब्लॉक, 956 लोकल फेऱ्या रद्द

Published:

मुंबई

मध्य रेल्वेवरील (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी सध्या ब्लॉकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटी मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक (Mega Block) असेल. गुरुवारी 30 मे 2024 रात्रीपासून ते रविवारी 2 जून 2024 दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी 31 मे 2024 रात्रीपासून ते रविवारी 2 जून 2024 दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत 74 रेल्वे गाड्या रद्द होणार असून 122 रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहे.

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11वर सध्या 16 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबत असून या प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे. हे काम पूर्ण मध्य रेल्वेकडून करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. ब्लॉक काळामध्ये मध्य रेल्वेवरील एकूण 956 लोकल फेऱ्या रद्द होतील.  शनिवारच्या दिवशी सुटीकालीन वेळापत्रक चालवण्यात येईल. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. 

या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नाही

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 161 लोकल फेऱ्या रद्द

शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द आणि 613 लोकल अंशत: रद्द

रविवारी 235 लोकल फेऱ्या आणि 270 लोकल अंशत: रद्द

शुक्रवारी चार रेल्वेगाड्या रद्द आणि 11 रेल्वेगाड्या अंशत: रद्द

शनिवारी 37 रेल्वेगाड्या रद्द आणि 31 रेल्वेगाड्या अंशत: रद्द

रविवारी 31 रेल्वेगाड्या रद्द आणि 80 रेल्वेगाड्या अंशत: रद्द 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img