21 C
New York

Blackout Movie: ‘हे’ मराठमोळे कलाकार झळकले हिंदी चित्रपटात!

Published:

गेल्यावर्षी 12th Fail चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey)प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. आता विक्रांतचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्लॅकआऊट’ (Blackout Movie) या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं. अभिनेत्री मौनी रॉय देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा थ्रिलर ड्रामा आहे. मात्र मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम (Chaya Kadam), अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणे (Karan Sonawane) या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ब्लॅकआऊट’ सिनेमाचा ट्रेलर आज (३० मे) रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ७ जूनला जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर रिलीज होणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं घरबसल्या प्रचंड मनोरंजन होणार आहे. सध्या मराठमोळे प्रसाद ओक, छाया कदम आणि करण सोनावणे हे मराठी कलाकार ‘ब्लॅकआऊट’मध्ये झळकणार आहेत. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रसाद ओकला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्याने आजवर अनेक मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हार्दिक-नताशा घटस्फोट? नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष!

याशिवाय छाया कदम यांच्याविषयी सांगायचं झालं, तर सध्या कलाविश्वात त्यांचं नवा चांगलंच चर्चेत आहे. अभिनेत्रीची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ या चित्रपटाचा कान्स सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय याआधी त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’सारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या. फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणेचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फोल्लोविंग आहे. रीलच्या मध्यामध्यातून अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.

चित्रपटात विक्रांत मेस्सी, मौनी रॉय, सुनील ग्रोव्हर, प्रसाद ओक, छाया कदम, फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणे, जिशू सेनगुप्ता, सौरभ घाडगे, रुहानी शर्मा, अनंत जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img