3.6 C
New York

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचे मोदींवर टीकास्त्र

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराची तोफा आज थंडावली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पंजाब मधील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी घूणस्पद भाषण करत आहे. मोदी यांच्या पंतप्रधान पदाची पत आणि प्रतिष्ठा कमी केली आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. या देशात काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतीशील भविष्य देऊ शकते. काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे. देशात अमानवीकरणाचा प्रकार परमोच्च बिंदूवर गेला आहे. त्यामुळेच आता आपल्याला या शक्तींपासून आपला देश वाचवायचा आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे. शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वीच मनमोहन सिंग यांनी मोदींवर हल्ला चढवून त्यांच्या दहा वर्षाच्या कामगिरीचा पंचनामाही केला आहे.

मनमोहन सिंग म्हटले की, यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचं मूल्य केवळ चार वर्षाचं आहे, असं भाजपला वाटतंय. यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येत आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अग्निवीर योजनेवरून भाजपला धारेवर धरलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img