5.3 C
New York

Loksabha Election : लोकसभाच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफ थंडावला

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराची तोफा आज थंडावली आहे. 1 मे रोजी होणाऱ्या सातव्या टप्प्या 57 मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. सातव्या टप्प्यात होणार निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात देखील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघातील मतदार 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान करतील. 1 जून रोजी उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि चंदीगडमधील मतदारसंघात मतदान होणार आहे.

सातव्या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैकी 328 पंजाबमधील, 144 उत्तर प्रदेश, 134 बिहार, 66 ओडिशा, 52 झारखंड, 37 हिमाचल प्रदेश आणि चार चंदीगडमधील आहेत.

सातव्या टप्प्यातील हाय होल्टेज लढती

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काँग्रेस)

कंगना रणौत (भाजप) विरुद्ध विक्रमादित्य सिंह (काँग्रेस) मंडीत

गोरखपूरमध्ये रवी किशन (भाजप) विरुद्ध काजल निषाद (समाजवादी पार्टी)

अनुराग ठाकूर (भाजप) विरुद्ध सतपाल सिंग रायजादा (काँग्रेस) हमीरपूर

डायमंड हार्बरमध्ये ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (TMC)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img