23.1 C
New York

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना भोवलेली वादग्रस्त वक्तव्ये

Published:

मुंबई

विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. मात्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा केला जात आहे. यावर आव्हाडांनी माफीही मागितली. मात्र, त्यानंतरही राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून (BJP) राज्यभरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले जात आहे. जितेंद्र आव्हाडांचे ही पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. त्यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये (Controversial Statement) केली आहेत.

जितेंद्र आव्हाडांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्य?

1) मनुस्मृती ग्रंथाचं दहन – शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ‘एससीईआरटी’ने मांडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी 28 मे ला महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.

2) राम मांसाहार – आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य शिर्डी येथील शिबिरात केलं आहे. राम शिकार करायचा आणि मांसाहार खायचा, मग राम शाकाहारी कसा? रामानं वनवासात 14 वर्ष काढली, तिथं काय शाकाहारी आहार मिळाला असेल का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. यानंतर आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

3) जगत्‌गुरु तुकाराम महाराज– जगत्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याविषयी जुलै 2018 मध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुकाराम महाराज यांचा खून झाला होता. या वक्तव्यानंतर आव्हाडांवर प्रचंड टीका झाली होती. वारकरी संप्रदायाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

4) छत्रपती शिवाजी महाराज– मार्च 2023 मध्ये जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं महत्त्व उरणार नाही. अफझलखान, औरंगजेब आणि शाहिस्तेखान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून आला. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसला नसता. यावेळी देखील आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि त्यांच्यावर समाजातून टीका झाली.

5) मग अण्णा हजारे गप्प का? देशात काँग्रेसचं सरकार असताना अण्णांनी दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात आंदोलनं केली. यानंतर काँग्रेसचं सरकार गेलं; पण आता जगभर प्रसिद्ध असलेले समाजसेवक अण्णा हजारे भाजपा विरोधात शांत कसे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला होता. यावेळी त्यांच्यावर भाजपाने टीका केली होती आणि आव्हाड चर्चेत आले होते.

6) आणीबाणीने गळा घोटला– 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी 2020 मध्ये केलं होतं. यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

7) अल्ला को 2011 में पता था- जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा फेब्रुवारी 2021 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘अल्लाला 2011 मध्ये माहित होतं की, 2020 मध्ये कोरोना येणार. म्हणून 2019 रोजी मुंब्र्यात नवीन कब्रस्तान बनविलं आहे.’ आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

8) छत्रपती संभाजीराजेंना बदनाम करण्याचं काम– सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीनं संभाजीराजे हे रग्गेल आणि रंगेल होते. तसेच ते स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. यावेळी त्यांच्यावर संभाजी ब्रिगेड आणि भाजपानं टीका केली होती.

9) औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता– जानेवारी 2023 मध्ये आव्हाडांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केल्यानंतर तेव्हा नव्या वादाला तोंड फुटलं होतं.

10) न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो – न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, मी कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असे बोललेलो नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आज पूर्णपणे घुमजाव केला आहे.

11) मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य – मतदानाच्या दिवशी तुमचा नवरा मटण आणा म्हणाला तर आणू नका. बिर्याणी बनवा म्हणाला, तर बनवू नका. तुम्ही त्यांना म्हणा, रात्रीच झोपेच्या वेळी फजरची नमाज पठण करा आणि पहिल्यांदा माझ्याबरोबर येऊन मतदान करा. नाहीतर आपली सवय आहे. बोलतील सुट्टीचा दिवस आहे. सकाळी उशिरा उठू. मराठी लोक बिचारे लवकर उठतात. माझे काही अक्कलवान भाऊ आहेत, ते सकाळी 12 वाजता उठतात. बायकोला रात्रीच म्हटले असतील. घोष घेऊन ये. बिर्याणी वगैरे बनवू. सकाळी उठून आंघोळ करून खाऊ. त्यानंतर म्हणतील थोड्या वेळ झोपू. त्यानंतर थेट पाच वाजता उठतील असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img