मुंबई
राज्य सरकार कडून शाळेमध्ये या वर्षापासून मनुस्मृतीचे शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बुधवारी नाशिक येथे मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन करत राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. त्यानंतर त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. आज देखील सत्ताधारी पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) धावून आले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मनुस्मृतीवरून लक्ष हटवण्यासाठी आव्हाडांवर आरोप केले जात आहेत. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. त्यांची भावना होती की मनुस्मृतीचे दहन केले पाहिजे, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि ते चित्र त्यांनी तेथे लोकांच्या समोर फाडलं. काय आहे ते देखील पाहिलं नाही आणि इतर सगळ्यांनीही त्यांचं अनुकरणं केलं. मात्र त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या कृतीबद्दल माफीसुद्धा मागितली. त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. आमचा विरोधक आहे म्हणून टीका करण्यात अर्थ नाही, असं सांगत भुजबळांनी त्यांचं समर्थन केलं.
छगन भुजबळ म्हणाले की, शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको, बहुजन समाज, मनुस्मृतीला विरोध करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं. हा फोकस दूर होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बोललं जाईल, असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी फडणवीसाचं म्हणणंदेखील स्पष्ट केलं. ते म्हणाले की फडणवीसांनीदेखील सांगितलं आहे की शिक्षणात मनुस्मृतीचा चंचूप्रवेश होऊ देणार नाही. महा हा चंचूप्रवेश पाहिजे कशाला? तुमच्याकडे ज्ञानेश्वरांचे, तुकारामांचे श्लोक नाहीत का? अचानक हे सर्व आणायचं कारण काय? त्याच्यामागे काय चाललंय हे आपण शोधलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले दीपक केसरकर हे त्याची भालमण करतात हे मला अतिशय दु: खदायक वाटलं, अशा शब्दांत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला.