23.1 C
New York

Crime News : भुसावळ हादरलं! धावत्या कारवर अंदाधुंद गोळीबार

Published:

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर (Crime News) आली आहे. शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मयतांमध्ये माजी नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्याचा समावेश आहे. हा गोळीबार का करण्यात आला याचं कारण अजून समोर आलेलं नाही. या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये असून त्यांनी भुसावळ शहरात नाकाबंदी केली आहे. हल्लेखोरांचा तपास केला जात आहे.

भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागातून एक कार चालली होती. त्यावेळी येथील एका मंदिराच्या परिसरात दोघेजण दबा धरून बसले होते. कार जवळ येताच त्यांनी जोरदार गोळीबारास सुरुवात केली. या कारमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह आणखी तिघे होते. या गोळीबारात संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

ईव्हीएममधील छेडछाड कशी ओळखायची?

Crime News पोलिसांकडून छापेमारी सुरू

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर लोकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांनी मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठवून दिले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी नाकाबंदी केली. आरोपींचा शोध घेण्यात येत असला तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. मागील वैमनस्याच्या कारणातून ही घटना घडली असावी असे सांगण्यात येत आहे.

Crime News हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय ?

दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी काल रात्रीच जिल्हा रुग्णालयात येऊन मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय, हल्ला कुणी केला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपी पकडल्यानंतर या हत्याकांडा मागचं खरं कारण समोर येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img