3.6 C
New York

Loksabha Election : पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?, जाणून घ्या

Published:

देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. यंदाची निवडणूक अनेक अर्थानी खास आहे. पीएम मोदी पुन्हा मैदानात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, स्मृती इराणी यांसारखे दिग्गज नेतेही मैदानात आहेत. या उमेदवारी अर्जांबरोबर त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीची सुद्धा माहिती दिली आहे. याचं कुतूहल सामान्य माणसाला नेहमीच असतं राजकारणी मंडळींकडे किती पैसा आहे . आपला नेता किती श्रीमंत आहे, त्याचं राहणीमान कसं आहे या गोष्टींची चर्चा नेहमीच होत असते. आज आपण जाणून घेऊ या की, राहुल गांधी,पंतप्रधान मोदी या नेत्यांकडे किती संपत्ती आहे.

Loksabha Election पीएम मोदींकडे किती संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत त्यांच्या हातात 24 हजार 920 रुपये रोख होते. तसेच 13 मे रोजी 28 हजार रुपये निवडणूक बँक खात्यातून त्यांनी काढले. अशा पद्धतीने त्यांच्या हातात एकूण 52 हजार 920 रुपये होते. त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 86 लाख 40 हजार 642 रुपये जमा आहेत. यात स्टेट बँकेतील एफडीमध्ये 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपये जमा आहेत. गांधीनगर येथील स्टेट बँकेच्या खात्यात 73 हजार 304 रुपये जमा आहेत. 9 लाख 12 हजार 398 रुपयांचे नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट मोदी यांच्याकडे सुद्धा आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांना टीडीएस रिटर्नच्या आधारावर 3 लाख 31 हजार 179 रुपये मिळाले. अशा प्रकारे मोदींची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे. 2019 मधील प्रतिज्ञापत्रात मोदींची संपत्ती 2 कोटी 51 लाख 36 हजार 119 रुपये होती. मोदींच्या संपत्तीत 50 लाख 70 हजार 770 रुपयांची वाढ मागील पाच वर्षात एकूण झाली आहे.

ईव्हीएममधील छेडछाड कशी ओळखायची?

Loksabha Election राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधीनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2018-19 या वर्षात राहुल गांधींनी 1 कोटी 20 लाख 37 हजार 700 रुपयांची कमाई केली. 2019-20 मध्ये 1 कोटी 21 लाख 54 हजार 470 रुपये, 2020-21 मध्ये 1 कोटी 29 लाख 31 हजार 110 रुपये, 2021-22 मध्ये 1 कोटी 31 लाख 4 हजार 970 रुपये आणि 2022-23 या वर्षात 1 कोटी 2 लाख 78 हजार 680 रुपये होती. राहुल गांधी यांच्या जवळ वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 55 हजार रुपये रोख पैसे आहेत. एसबीआय पार्लीयामेंट हाऊस खात्यात 2,21,383 रुपये, एचडीएफसी बँकेच्या खात्यात 26,25,271 रुपये आहेत. 15 मार्च 2024 रोजी राहुल गांधींकडे एकूण चल संपत्ती 9,24,59,264 रुपये होती. यामध्ये विविध कंपन्यांचे 4,33,60,519 रुपयांचे शेअर्स आहेत. तसेच त्यांच्याकडे 11,15,2,598 रुपयांची अचल संपत्ती आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यंदा कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार यादव यांच्याकडे एकूण 26,34,92,586 रुपये इतकी संपत्ती आहे. 2009 मधील निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती 5,52,83,157 रुपयांची संपत्ती होती. पंधरा वर्षात त्यांच्या संपत्तीत पाच पट वाढ झाली आहे. आजमितीस अखिलेश यांच्याकडे 25,64,804 रुपये कॅश आहे. त्यांच्याकडे एकूण 9,12,91,728 रुपयांची चल संपत्ती आहे. तसेच त्यांच्या नावावर 17 कोटी 22 हजार 858 रुपयांची अचल संपत्ती आहे.Loksabha Election 15 वर्षांत पाच पट वाढली अखिलेश यादव यांची संपत्ती

Loksabha Election स्मृती इराणीच्या संपत्तीत सहा कोटींची वाढ

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत 6 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती 11 कोटी रुपयांची होती. आता 2024 मधील निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार इराणींची संपत्ती 17 कोटींच्या पुढे गेली आहे. स्मृती इराणी यांच्याकडे 1 लाख 8 हजर 740 रूपये, त्यांचे पती जुबिन इराणी याच्याकडे 3,21,700 रुपये कॅश आहेत. त्यांच्याकडे एकूण 3 कोटी 8 लाख 94 हजार 296 रुपयांची चल संपत्ती आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img