19.3 C
New York

Chhota Rajan : जया शेट्टी हत्याप्रकरणात छोटा राजन दोषी

Published:

मुंबई

हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी हत्याप्रकरणी (Jaya Shetty Murder Case) छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए एम पाटील यांनी ही शिक्षा सुनावलीय. ही त्याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची दुसरी शिक्षा आहे. छोटा राजन (Chhota Rajan) हा पत्रकार जे डे हत्येप्रकरणी यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा (Convicted) भोगत आहे.

जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिक होत्या. मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालकीण होत्या. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी टोळीकडून फोनही येत होते. जया शेट्टीने खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी जया शेट्टी यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.

राजन हा पूर्वी कुख्यात माफिया आणि मुंबई अंडरवर्ल्डमधील गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. मात्र १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दोघांमध्ये बिनसलं आणि राजनने स्वतःची वेगळी टोळी बनवली. या दोन टोळ्यांमध्ये अनेक वर्षे संघर्ष झालेला मुंबईकरांनी पाहिला आहे. १९९० आणि २००० च्या दशकात मुंबईत टोळीयुद्ध भडकलं होतं. या काळात राजन टोळी आणि दाऊद टोळीत अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये संघर्ष झाला. या टोळीयुद्धा अनेक गुंड मारले गेले तर अनेकांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटरच्या भीतीने दाऊद, राजनसह अनेक कुख्यात गुंड मुंबईसह भारत सोडून पळू गेले होते. २०१५ मध्ये पोलिसांनी राजनला इंडोनेशियन पोलिसांच्या मदतीने अटक केली आणि भारतात आणलं. मात्र, दाऊद अजूनही फरार आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस अजूनही दाऊदचा शोध घेत आहेत. मात्र दाऊद त्यांच्या हाती लागलेला नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img