8.4 C
New York

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणातील मोठी अपडेट; बिश्नोई गँग…

Published:

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. १४ एप्रिलला पहाटे सलमानच्या वांद्रे येथील घरावर दोन व्यक्तींनी गोळीबार केला. आतापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. हा हल्ला तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट लिहित या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. आज चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे.


सागर पाल, विक्की चौधरी, सोनू चंदर, अनुज थापन आणि मोहम्मद चौधरी असं पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींचे नाव आहेत. परंतु, यातील सहाव्या आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. अशातच आता चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. गोळीबार प्रकरणामध्ये शुटर्सना मदत करण्याच्या संशयावरून त्यांना अटक केलेली आहे.

हार्दिक-नताशा घटस्फोट? नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष!


करण कपूर, रवींद्र सिंह आणि जावेद झिंझा असे आरोपींची नावं आहेत. या तिनही आरोपींवर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी वर्चुअल नंबर आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात होते. तिन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सदस्य आहेत. त्यांना लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. सलमान खानच्या घरावर १४ एप्रिलला पहाटे विक्की चौधरी आणि सागर पाल या दोन आरोपींनी गोळीबार केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img