3.5 C
New York

Central Railway : आजपासून मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक

Published:

मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. (Central Railway) मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात 900 हून अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईतील चाकरमाण्यांचे आणि लांब पल्ल्याचा प्रवासा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने एक निवेदन जारी करून या मेगाब्लॉकविषयी माहिती दिली आहे. या मेगाब्लॉकमुळं लोकलचे वेळापत्रक बदलणार असून नागरिकांचेही वेळापत्रक कोलमडणार आहे. तसेच मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन देखील केले आहे. मध्य रेल्वेकडून शनिवारी देखील रविवारच्या वेळापत्रकाने ट्रेन धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Central Railway 72 मेल/एक्स्प्रेस आणि 956 लोकल गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले की, “ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल, तर सीएसएमटी (CSMT) स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्ताराशी संबंधित कामांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक सुरू होईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले की, मुख्य आणि हार्बर मार्गावरील 72 मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि 956 मुंबई लोकल गाड्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत रद्द केल्या जातील. वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक येथून अनेक मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट-रूट केल्या जातील असे त्यांनी सांगितले आहे.

भुसावळ हादरलं! धावत्या कारवर अंदाधुंद गोळीबार

Central Railway कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन

मेगा ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्या रद्द करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सर्व आस्थापनांना तुमच्या कर्मचाऱ्यांना या काळात प्रवासी संख्या कमी करण्यासाठी घरून किंवा इतर कोणत्याही मार्गाने काम करण्याची संधी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी केले आहे.Central Railway कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहनमेगा ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्या रद्द करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सर्व आस्थापनांना तुमच्या कर्मचाऱ्यांना या काळात प्रवासी संख्या कमी करण्यासाठी घरून किंवा इतर कोणत्याही मार्गाने काम करण्याची संधी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img