देवदर्शनाला जात असताना भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अखनूर येथे झाला आहे. भाविकांनी भरलेली बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी जाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अखनूर परिसरातील चौकी चौरा येथे चुंगी वळणावर हा अपघात झाला आहे.
भाविकांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाविकांनी भरलेली ही बस उत्तरप्रदेशातील हाथरस येथून आली होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात अनेक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमी भाविकांना उपचारासाठी अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकांना जम्मू शहरातील सरकारी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अंधारेंची आव्हाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट
Jammu Kashmir 6 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झाला होता अपघात
सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये असाच एक अपघात झाला होता. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील अस्सार परिसरात एक बस 300 फूट खोल दरीत कोसळली होती. या अपघातात 9 महिलांसह 38 जणांचा मृत्यू झाला होता. ही बस किश्तवाड येथून जम्मूच्या दिशेने जात होती त्याच दरम्यान बसला अपघात झाला होता.