-3.8 C
New York

Panchayat: ‘पंचायत’ फेम अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ?

Published:

ओटीटीवर सर्वात लोकप्रिय सीरिज ‘पंचायत’ Panchayat चा तिसरा भाग रिलीज झाला असून यात फुलेरा गावातल्या राजकारणावर मजेशीर कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये गावचा सचिव आणि प्रधानजींची लेक रिंकीची हलकी फुलकी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. जितेंद्र कुमारने सचिवची आणि अभिनेत्री सान्विकाने Sanvika Singh रिंकीची भूमिका या सीरिज मध्ये साकारली आहे.

‘पंचायत’ या सिरीजमुळे रिंकीचे सोशल मीडियावर भरपूर चाहतेवर्ग वाढले आहे. सीरिजमध्ये साधीसुधी दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात खूपच अनोखी आणि बोल्ड आहे. तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. सान्विकाने दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळीच ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. ‘पंचायत’ आधी तिने ‘हजामत’ आणि ‘लखन लीला भार्गव’ या दोन अशा सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेत ती झळकली आहे परंतु ‘पंचायत’ या सिरीज पासून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

लव्हर्स डे निमित्त ‘हा’ चित्रपट केवळ ९९ रुपयात!

‘पंचायत’च्या पहिल्या सिझनमध्ये सान्विकाची शेवटी झलक दिसते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सिझनमध्ये तिची सचिवजींसोबत लव्हस्टोरी फुलते. सान्विकाने या सीरिजमधून सर्वांचं मन जिंकलं. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या सिरीजमधील अभिनय आणि बोल्ड अंदाजामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. तसेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img