21 C
New York

Pune News : पुण्यात नेमंक चाललंय तरी काय?

Published:

मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत (Pune News) असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल अनेकांना पडत आहे. कारण अटकेत असताना ससूनमधून धूम ठोकल्याचं ललित पाटील प्रकरण ते कल्याणीनगर अपघातात तरुणी-तरुणीला चिरडल्याच्या घटना नवीनच घडलेल्या आहेत. अशातच कल्याणीनगर अपघाताची घटना ताजी असताना पोलिस आयुक्तालयाजवळच (Commissioner of Police Office)दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. पोलिस आयुक्तालयाजवळच हा प्रकार घडत असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडालीयं.

Pune News पुण्यात नेमंक चाललंय तरी काय?

ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील शासकीय यंत्रणेवर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले होते. त्यावेळी पुणे राज्यात चांगलच चर्चेत आलं होतं. हे प्रकरण संपत नाही तोवरच कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणीला कारने चिरडले. एवढचं नाहीतर यातून सुटका मिळण्यासाठी थेट ससूनमध्ये मेडिकल करताना रक्ताचे नमुनेच बदलल्याचं समोर आलंय. या संपूर्ण घडामोडींवरुन पुणेकरांसह विरोधकांकडून संताप व्यक्त होत असतानाच आता पोलिस आयुक्तालयाजवळ दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आलायं. त्यामुळे पुण्यात नेमंक चाललंय तरी काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होताना दिसून येत आहे.

आता सातबाऱ्यावर आईचंही नाव, राज्य सरकारचा मोठा निर्णय

अपघात प्रकरणानंतर पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीसह त्याच्या वडिलांना मदत केली असल्याचा आरोप होतोयं. एवढचं नाहीतर अपघात प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई अन् आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याचा ठपका लागलायं. त्यात आता दारुच्या बाटल्या सापडल्याने आणखीनच भर पडलीयं. अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील पब, हॉटेल्सवर प्रशासनाकडून जोरदार कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यातच अल्पवयीन मुलांना दारु विक्री होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून पब, हॉटेल्सकडून मोठ्या प्रमाणात हप्तेवसुली केली जात असल्याचा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलायं. एवढचं नाहीतर कार्यालयात आंदोलन करुन हप्ते घेणाऱ्यांची यादीच धंगेकरांनी यावेळी वाचून दाखवली

Pune News रिकाम्या दारुच्या बाटल्या कशा पोहोचल्या?

पुणे पोलिस आयुक्तालयाजवळ रिकाम्या दारुच्या बाटल्या कशा पोहोचल्या? या बाटल्या कोणी आणून टाकल्या? या बाटल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्याच आहेत काय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहेत. आता या प्रकरणावर पोलिस आयुक्तालयाकडून अद्याप तरी कोणंतही स्पष्टीकरण देण्यात आलं नसून पोलिस आयुक्त या प्रकरणावर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img