23.1 C
New York

Watul: वाटूळच्या सुपुत्राने तयार केला काव्यातून लघुपट!

Published:

वाटूळ (Watul) गावावर आधारित काव्य लघुपट रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी आदर्श विद्यामंदिर या विद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. हा लघुपट गावातील निसर्गसंपदा, समाजजीवन, संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवतो. या लघुपटाचे अनावरण एका भव्य समारंभात करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

या काव्य लघुपटाला संगीतकार प्रणय शेट्ये, अभिनेते अनिल सुतार, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, उद्योजक विश्वास विठ्ठल चव्हाण, वाटूळ प्रशालेचे मुख्याध्यापक कामत सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांनी आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या.लघुपट प्रदर्शित झाल्यावर गावातील लोकांना खूप आवडला व त्यांनी या लघुपटाची प्रशंसा केली. हा लघुपट गावासाठी मौल्यवान खजिना असून वाटूळ गावासाठी आणि त्याच्या समृद्ध वारश्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे.

हा लघुपट गावातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि गावच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यासाठी मदत करेल तसेच या लघुपटामुळे वाटूळ गावचे निसर्गसौंदर्य व पर्यटन जगभर पोहचण्यास मदत होणार आहे. या काव्य लघुपटाचे कवी व दिग्दर्शक वाटूळ गावचे सुपुत्र विराज विलास चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून या लघुपटाचा प्रवास लोकांसमोर मांडला व ज्यांनी या लघुपटाला मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

या लघुपटाचे छायाचित्रण वाटूळ गावचे सुबोध वळंजू यांनी केले असून संगीत प्रणय शेट्ये आणि कवितेला आवाज अनिल सुतार यांनी दिला आहे. या लघुपटात अभिनयाची चुणूक वाटूळ गावचे युवा सूरज पांचाळ याने दाखवली आहे तर नृत्य रत्नागिरीच्या आकांक्षा साळवी हिने केले आहे. हा ‘काव्य लघुपट ‘ तुम्ही “सुपर सुबोध” या युट्यूब चॅनलवर पाहू शकता.या कार्यक्रमाला ह.भ. प. बाळकृष्ण मुरारी चव्हाण, उद्योजक विश्वास विठ्ठल चव्हाण, वाटूळ प्रशालेचे मुख्याध्यापक कामत सर, अभिनेते अनिल सुतार, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, संगीतकार प्रणय शेट्ये, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सुरेश भाई चव्हाण, अँड. किशोर वळंजू, माजी सरपंच अभय चव्हाण, संतोष भुर्के, वा. मं. वि. सोसायटी चेअरमन कृष्णा चव्हाण, वाकेड गावचे सरपंच संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण, संतोष चव्हाण, वाटूळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चव्हाण, ओमकार चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण वळंजू, उपाध्यक्षा वर्षा चव्हाण, पत्रकार प्रकाश वळंजू, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत पांचाळ, ज्ञानदेव चव्हाण तसेच गावातील युवा वर्ग, महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img