10 C
New York

Losabha Election : यंदा फक्त 6 ‘भिडू’ देताहेत PM मोदींना टक्कर

Published:

लोकसभा निवडणुकीत सहा टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. (Losabha Election) आता 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यादिवशी 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होतील. सुरत मतदारसंघातील निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. निकाल लागल्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने जिंकणाऱ्या उमेदवारांची चर्चा तर होईलच याच बरोबर अतिशय कमी मतांनी पराभूत होणाऱ्यांची सुद्धा चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.

उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ वाराणसी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवले आहे. तसेच आणखी पाच उमेदवार रिंगणात आहेत. अतहर जमाल लारी यांना बहुजन समाज पार्टीने तिकीट दिले आहे. या मतदारसंघात मोदींची चर्चा होईलच शिवाय त्यांना टक्कर देणार उमेदवार कोण होते याचीही चर्चा होईल. पीएम मोदींच्या विरोधात सन 2014 मधील निवडणुकीत तब्बल 41 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 19 अपक्ष होते. 2019 मधील निवडणुकीत 26 उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यापैकी 8 अपक्ष उमेदवार होते. आताच्या निवडणुकीत सुरुवातीला 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नंतर यातील एका जणाने माघार घेतली. यानंतर सात उमेदवार उमेदवारी अर्ज छाननीतून पुढे जाण्यात यशस्वी ठरले. आता हे सहा उमेदवार कोण आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देत आहेत याची माहिती घेऊया..

Losabha Election काँग्रेसकडून अजय राय पुन्हा मैदानात

अजय राय काँग्रेसमधील दिग्गज नेते आहेत. मागील निवडणूकही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढली होती. 2009, 2014 आणि 2019 या तीन निवडणुका त्यांनी वाराणसी मतदारसंघातून लढल्या. मात्र या सगळ्याच निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तरी देखील काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राय यांच्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्याकडे चल संपत्ती 6.66 कोटी आणि 1.25 कोटींची अचल संपत्ती आहे. अजय राय पाच वेळेस आमदार राहिले आहेत. भाजपनेच कोलासला मतदारसंघात तर तीन वेळेस त्यांना तिकीट दिले होते. 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या काळात अजय राय पिंडरा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.

जम्मू काश्मीरने केला एक नवीन विक्रम

Losabha Election जनता पार्टी, अपना दल आता ‘लारी’ बसपाचे उमेदवार

बहुजन समाज पार्टीने अतहर जमाल लारी यांना तिकीट दिले आहे. सन 1977 मध्ये जनता पार्टी अस्तित्वात आल्यानंतर लारी त्या पक्षात सहभागी झाले. पक्षात अनेक पदांवर काम केले. 1984 मध्ये लारी यांनी जनता पार्टीच्या तिकिटावर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढली मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1991 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावले. 1995 मध्ये सोने लाल पटेल यांच्या नेतृत्वात जनता पार्टीच्या विघटनानंतर अपना दल या पक्षात सहभागी झाले.2004 क्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाने त्यांना तिकीट दिले. या निवडणुकीत लारी वाराणसीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2012 मध्ये त्यांनी मुख्तार अन्सारीच्य कौमी एकता दल पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढली. 2022 मधील निवडणुकीत त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला होता. निवडणुकीनंतर त्यांनी बसपात प्रवेश केला.

Losabha Election गोशाळेचे मालक शिवकुमार

हैदराबाद येथील रहिवासी शिवकुमार तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे माजी सदस्य आहेत. हैदराबाद मध्ये त्यांच्या तीन गोशाळा आहेत. या गोशाळांमध्ये दीड हजार गायींना आश्रय दिला आहे. त्यांची अशी मागणी आहे की केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे. भाजप सनातन धर्माबद्दल फक्त बोलतो पण काहीच करत नाही अशी त्यांची तक्रार आहे.

Losabha Election समाजवादी सोडली अन् यादवांना उमेदवारी मिळाली

लोकसभा निवडणुकीत यादव पहिल्यांदाच उमेदवारी करत आहेत. 39 वर्षीय दिनेश कुमार यादव अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिनेश यादव मागील पंधरा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

Losabha Election सामाजिक काम पण मोदींवर टीका, तिवारी अपक्ष उमेदवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून राजधानी दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार तिवारी यांनी सुद्धा निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.मी पंतप्रधान मोदींचा टीकाकार आहे म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे तिवारी यांनी सांगितले. मोदी यांच्या धोरणांवर संजय कुमार सातत्याने टीका करत असतात. आता अपक्ष म्हणून त्यांनी रिंगणात उडी घेतली आहे.

Losabha Election अरविंद केजरीवालही झाले होते पराभूत

मागील दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. 2014 मध्ये मोदींनी आम् आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 3 लाख 72 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2019 मधील निवडणुकीत मोदींनी पुन्हा विजय मिळवला त्यावेळी त्यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होऊन एकूण मते 4.59 लाख इतकी झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img