7.3 C
New York

Manoj Jarange : जरांगेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेदम मारहाण

Published:

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट एका ३५ वर्षीय तरुणाने केली होती. त्यामुळे जरांगेंच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली पोलीस ठाण्यात नेले. छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारासतणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange काय आहे प्रकरण?

दीपक बद्री नागरे (वय ३५ वर्ष, राहणार मुकुंदवाडी) असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी दरम्यान अधिक माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध सोशल मीडियावरती मंगळवारी रात्री आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. व्हॉट्सअपवर आलेली ही पोस्ट वेगाने मराठा समाजामध्ये पसरली. ही पोस्ट सोशल मीडियावर पसरली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये 200 ते 250 जणांचा जमाव जमा झाला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू झाली.

बर्थ-डे सेलिब्रेशन करून परतताना अपघात; 6 ठार

Manoj Jarange तरुणाला रागातून मारहाण

यावेळी संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली. मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत. मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेला. त्या ठिकाणी त्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली व त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर हा फोटो व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत त्यावरती आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप आहे.

Manoj Jarange 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी

4 जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा सरकारला दिला आहे. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल, असंही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img