5.5 C
New York

Stress In Youth : सोशल मीडिया ठरतेय वाढत्या तणावाचा तरुणांमध्ये होणारा स्ट्रेस

Published:

Stress In Youth : तरुणांच्या मनावर परिणाम होण्याचं एकमेव कारण सोशल मीडिया ठरतेय. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने तरुणांच्या मनावर परिणाम होतो आहे. त्यामुळे मानसिक संतुलन व आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

Stress In Youth : स्मार्टफोन आणि इंटरनेट सध्या तरुणांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन आल्यापासून तरुणाईचा संपूर्ण वेळ सोशल मीडियावरच निघून जातो.

आजकालच्या लहान मुलांनासुद्धा सोशल मीडिया फार आवडायला लागली आहे. आणि त्यामुळेच सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणावदेखील झपाट्याने वाढत आहे. ज्याच्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. सोशल मीडिया आणि तणाव यांच्यामधला संबंध जाणून घेऊया…

निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत उपयुक्त

या सगळ्यामुळे एकटं पडल्यासारखं वाटत आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. एखादी गोष्ट मनाला लावून घेतली असेल तर ती सोशल मीडियावर स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात, त्यामुळेच त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि तणाव वाढायला लागतो.

सारखाच स्मार्टफोन वापरल्याने तरुणांचा दिवसभरचा दिनक्रम विस्कळीत झाला की पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यांची चिडचिड होऊ लागते.

मोबाईलची स्क्रीन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे झोपेला मदत करणारा हार्मोन मेलोटोनियम बाहेर न पडल्यामुळे नंतर समस्या जास्त वाढू शकतात.

सोशल मीडियामुळे तणाव वाढण्याची ४ कारणे
१. सोशल मीडियाचा वापर जास्त केल्याने तरुणाईला काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहत आणि त्यांच्या या भीतीला FOMO (Fear of Missing Out) असं म्हणतात, ज्याच्यामुळे मानसिक ताण आणि चिंता वाढण्याची शक्यता असते.

२. काही जणांना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर ऑनलाईन छळ असो वर कोणत्याही प्रकारच्या धमक्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

३. सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने किंवा सारखं फोनमध्ये पाहत राहिल्याने झोप कमी होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने थकवा येणे, पाय थरथरणे, कशातच लक्ष न लागल्याने, चिडचिड जास्त होणे जी सगळी तणावाची लक्षणे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img