21 C
New York

Sanjay Shirsat : संजय शिरसाठ यांचा सुषमा अंधारेला टोला,म्हणाले

Published:

आम्ही गृहखातं सुषमा अंधारेंकडे देणार नाही, उबाठा गटाच्या नेत्यांकडे देऊ. त्या गटातले सगळेच नेते खूप सक्षम आहेत. त्यामुळे लंडनवरून ते परत आले की, त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपावण्यात येणार आहे, असं म्हणत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाला टोला लगावला आहे. (Politics Let him come from London give home ministry Sanjay Shirsat s on Uddhav Thackeray) उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे अपघात प्रकरणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी जर फडणवीस सक्षम नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन ते पद माझ्याकडे द्यावं, त्यांच्या या टीकेवर संजय शिरसाट यांनी उत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, सुषमा अंधारेंनी केलेल्या सर्व वक्तव्यांची आम्ही नोंद घेतली आहे. त्यानुसार, लंडनहून आल्यानंतर या संदर्भात बसून निर्णय घेतला जाईल तसंच, ठाकरे गटाला लागणारी सर्व खाती त्यांना दिली जातील, असा टोला लगावला.

CM शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस

Sanjay Shirsat सामनाला आम्ही महत्त्व देत नाही

सामना या वृत्तपत्रातून पुणे अपघात प्रकरणावरुन सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात सरकारलाच तुरुंगात डांबायला हवं, असं म्हटलं होतं, यावर उत्तर देताना, संजय शिरसाट म्हणाले की, सामनामध्ये काय छापून येतं याला आम्ही महत्त्व देत नाही. सरकार आपलं काम करत आहे.

Sanjay Shirsat तावरेंची सुरक्षा पोलीसांचं काम

सुषमा अंधारे यांनी आज ट्वीट करत एक शंका व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मी अनेकांची नावं घेईन, असं म्हटलंय. त्यामुळे आता त्यांच्या जीविताला धोका आहे, असं अंधारे म्हणाल्या. याबाबत विचारलं असता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तावरेंची सुरक्षा करणं पोलिसांचं काम आहे. ते त्यांचं काम योग्यरित्या पार पाडतील, असं शिरसाटांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img