23.1 C
New York

Raju Waghmare : बाबासाहेबांची फोटो फाडणाऱ्या आव्हाडांना अटक करा- वाघमारे

Published:

मुंबई

शरद पवार गटाचे तथाकथित अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, सर्व आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू वाघमारे म्हणाले की, एकीकडे जय भीम म्हणायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांबद्दल मनात असलेला राग अशा प्रकारे बाहेर काढायचा, अशा दुहेरी मानसिकतेमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जितेंद्र आव्हाड आहेत. या कृत्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे माफी मागणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे. हे मगरीचे अश्रू आहे यांना काही किंमत नाही, असे राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले. मनुस्मृतीच्या बाबतीत दिल्लीमधून आलेल्या शिफारशींबाबत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आम्ही त्या सर्व शिफारशी स्वीकारणार नाही हे स्पष्ट केले आहे. मग ज्या गोष्टी अभ्यासक्रमात घेणार नाही, त्यासाठी हा स्टंट करण्याची काय आवश्यकता होती? असा सवाल राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. बाबासाहेबांचा फोटो आहे, असे त्यांचा कार्यकर्ता सांगत असताना सुद्धा आव्हाडांनी त्याकडे लक्ष न देता तो फोटो फाडला हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाबद्दल जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झालीच पाहिजे. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची शिवसेना पक्षातर्फे सरकारकडे मागणी आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. मग तो कितीही मोठा नेता असला तरी त्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे आमचे स्पष्ट मत आहे.

राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य करताना राजू वाघमारे म्हणाले की, पगला पोपट रोज सकाळी येतो व टीका करतो, खोट्या बातम्या व अफवा पसरवतो. तो काय बोलतो याचे त्याला भान नसते, उचलली जीभ की लावली टाळ्याला असे त्याचे वागणे आहे. त्याने आमचे प्रमुख नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले की, निवडणुकीच्या वेळेस बॅगांमध्ये पैसे भरून प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी व आमच्याबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी संजय राऊत अशा प्रकारची बेछूट विधाने करत असतात. कोणतेही कारण नसताना, कुठलाही पुरावा नसताना फक्त आमची बदनामी करण्याकरिता अशा प्रकारचे आरोप करायचे काम संजय राऊत करत आहेत. मुळात त्यांना शिवसेना ज्या प्रकारे महाराष्ट्रात तळागाळात रुजत चाललेली आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत. हे पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जात आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. पण त्यांच्या तोंडाला वेसण घालण्याची वेळ आता आलेली आहे. आम्ही त्यांना लीगली नोटीस पाठवली आहे त्यांनी जर आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असे राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img