अकोला
पुण्यातील (Pune) कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघात प्रकरणात (Pune Accident) आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एन्ट्री मारलीयं. बिल्डर विशाल अग्रवालने (Vishal Agarwal) कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? व्यवसायात कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच विशाल अग्रवालला वाचवणारी सगळीच नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केलायं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणाऱ्या डॉ. जोंधळे यांनाही असंच फरफटत नेलं. डॉ. जोंधळेंचे नाव कुठेही येत नाही, त्यांनाही असंच मारण्यात आलंय. या प्रकरणामागे जे काही राजकारण असेल पण हा वाहनचालकांचाच निष्काळजीपणा असून कडक शिक्षा झाली पाहिजे, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, तसेच सध्या आई वडिलांचं मुलांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. त्यामुळे यावर कडक कायदा येणं आवश्यक असून अल्पवयीन किंवा प्रौढ कोणीही असो, यासंदर्भात कडक कायदा येत नाही तोवर आळा बसणार नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अपघात प्रकरणी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांवरुन आंबेडकरांना सवाल केला असता त्यांनी अजित पवार यांच्यावरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नसल्याचं म्हटलंय. सध्या पोलिस सांगत आहेत त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.