21 C
New York

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची एन्ट्री

Published:

पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघात प्रकरणात (Pune Car Accident) आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एन्ट्री मारलीयं. बिल्डर विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? व्यवसायात कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच विशाल अग्रवालला वाचवणारी सगळीच नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केलायं. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले, अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणाऱ्या डॉ. जोंधळे यांनाही असंच फरफटत नेलं. डॉ. जोंधळेंचे नाव कुठेही येत नाही, त्यांनाही असंच मारण्यात आलंय. या प्रकरणामागे जे काही राजकारण असेल पण हा वाहनचालकांचाच निष्काळजीपणा असून कडक शिक्षा झाली पाहिजे, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

तसेच सध्या आई वडिलांचं मुलांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. त्यामुळे यावर कडक कायदा येणं आवश्यक असून अल्पवयीन किंवा प्रौढ कोणीही असो, यासंदर्भात कडक कायदा येत नाही तोवर आळा बसणार नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.अपघात प्रकरणी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांवरुन आंबेडकरांना सवाल केला असता त्यांनी अजित पवार यांच्यावरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नसल्याचं म्हटलंय. सध्या पोलिस सांगत आहेत त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘त्या’ पत्रावरून अजितदादा टिंगरेंवर भडकले

पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना तरुणी-तरुणाला कारने चिरडले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असतानाच मुलाला जामीन मिळाल्याने पुणेकरांकडून अजूनच संताप उसळून निघाला. त्यानंतर पबमालक, मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img