23.1 C
New York

Bollywood: लव्हर्स डे निमित्त ‘हा’ चित्रपट केवळ ९९ रुपयात!

Published:

(Bollywood) येत्या ३१ मे रोजी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr. & Mrs. Mahi) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) झळकणार आहेत. तसेच या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. पण त्याआधी प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 31 मे हा सिनेमा लव्हर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे त्यादिवशी तुम्ही अगदी स्वस्त दरात ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट पाहू शकता.

लव्हर्स डे निमित्त यादिवशी हा चित्रपट केवळ 99 रुपयांमध्ये चाहते पाहू शकतील. ही माहिती चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. चित्रपटाचा एक मिक्सअप व्हिडिओ शेअर करताना प्रॉडक्शन हाऊसने म्हटले आहे की, सिनेमा लव्हर्स डे दिवशी तुम्ही ‘मिस्टर अँड मिसेस माही’ची तिकिटे फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

माजी मुख्यमंत्र्यांची नात झळकली आयटम सॉंगमध्ये…


मल्टिप्लेक्स आणि भारतातील बहुतेक सिंगल-स्क्रीन थिएटर ठराविक वेळी सिनेमा २०२२ पासून लव्हर्स डे साजरा करतात. सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर चित्रपटाची तिकिटे केवळ 75 रुपयांना विकली गेली. त्यांनंतर सप्टेंबर 2023 मध्येही सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आता 31 मे रोजी हा दिवस साजरा करणार आहे. परंतु यावेळी तिकिटांची किंमत 99 रुपये असेल.

शरण शर्मा यांनी ‘मिस्टर अँड मिसेस माही’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, एक अयशस्वी क्रिकेटर राहिलेला व्यक्ती जो उत्तम क्रिकेट खेळतो आणि व्यवसायाने डॉक्टर आहे, आपल्या पत्नीला मोठा क्रिकेटर बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. राजेश शर्मा आणि जरीना वहाब देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img