भारतीय सिनेसृष्टीत सध्या खळबळ उडाली आहे. एका तरुणीने दिग्दर्शकाने अत्याचार केला असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा चित्रपट ओरू ओदार लवचा दिग्दर्शक ओमर लुलू (Omar Lulu) याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु दिग्दर्शक ओमरने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतची माहिती एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी ठोस पुरावे जमा केल्यानंतर आरोपी दिग्दर्शक ओमर लुलूला अटक केली जाऊ शकते. ओमर लुलूविरुद्ध आयपीसी कलम 376 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अवनीत कौरने केला साखरपुडा? पोस्टमुळे चर्चेला उधाण!
दरम्यान, दिग्दर्शक ओमरने आरोप फेटाळून लावले आहेत. ओमरने सांगितले की, “माझी आणि या मुलीची खूप दिवसांपासून मैत्री आहे. ती माझ्यासोबत अनेक सहलींना देखील आली होती. परंतु, आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असून सहा महिन्यांपासून आमचा संबंध नव्हता. तिने माझ्या अलीकडच्या चित्रपटातही काम केले होते. अशातच नवीन चित्रपटचं शूटिंग सुरू होताच, तिने अशी तक्रार दाखल केली आहे.
२०१६ मध्ये ओमर लुलूने मल्याळम चित्रपट हॅपी वेडिंगद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्या वर्षी मल्याळम उद्योगातील सर्वात हिट चित्रपटांपैकी त्यांचा हा चित्रपट एक होता. या चित्रपटाने 13.70 कोटींची कमाई तब्ब्ल 100 दिवसांत केली होती. यानंतर त्याने चंक्झ (Chunkz) आणि ओरू ओदार लव (Oru Odaar Love) या चित्रपटाचे 2019 मध्ये दिग्दर्शन केले. या चित्रपटातूनच प्रिया प्रकाश वॉरियर ही प्रसिद्धीच्या झोतात येऊन नॅशनल क्रश झाली होती. या चित्रपटातील तिचा विंक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.