मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिक येथील चवदार तलावावर राज्य सरकारकडून शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा (Manusmriti) अभ्यासक्रम आणणार असल्याने या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीचे दहन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या फोटो फाडला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने करण्यात आला असून जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. जाहीर निषेध! जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, असं अमोल मिटकरी म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आव्हाड यांनी थोर महापुरुषाचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध म्हणून महाडमध्ये अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.