17.4 C
New York

Satbara : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Published:

मुंबई

राज्य सरकारकडून (State Government) महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने राज्यात महिला धोरण (Women Policy) लागू केले आहे. त्यानुसार मुलगा किंवा मुलीच्या नावा नंतर आईचे नाव लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून सातबारावर (Satbara) आईचं (Mother Name on Satbara) नाव लागणार आहे. भूमी अभिलेखा विभागाने (Bhumi Abhilekh) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा एखादी सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावात आता आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत याबाबत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आईच्या नावासाठी सातबाऱ्यात नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील 6 महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल.

सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि अडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे. अभिलेख विभागामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयात 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावामागे आईचं नाव लावलं जाणार आहे. तसेच या तारखेआधी जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या आईचे नाव सातबाऱ्यावर लावायचे असल्यास ते देखील नाव लावू शकतात. फक्त त्यासाठी आपल्या आईची ओळख पटवून देणारा पुरावा त्या व्यक्तीला जमा करावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img