मुंबई
लोकलने प्रवास (Local Train) करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbaikars) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर (Thane Station) उद्या दिनांक 30 मे रोजी 62 तासांचा विशेष ब्लॉक (Special Block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway) कडून घेण्यात येणाऱ्या हा विशेष मेगा ब्लॉक (Mega Block) 30 मे रोजी रात्रीपासून सुरू होईल. या ब्लॉगमध्ये डाऊन फास्ट लाईनवर 62 तासाचा तर अप स्लो लाईनवर 12 तासाचा विशेष ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी (CSMT) ते भायखळा (Byculla) दरम्यान सीएसएमटी स्थानकाच्या कामाकरिता विशेष 36 तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी (Mumbai) प्रवास आवश्यक असला तरच करण्यात यावा असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी सांगितलं की, 1 आणि 2 जूनला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक होणार आहे. सीएसएमटी स्थानकात 10 आणि 11 नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील. तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहे. या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील. प्रयत्न असा आहे की, दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल, सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे, त्यानंतर आता ठाणे स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरु होईल.
या गाड्या रद्द होणार?
शुक्रवारी, 31 मे रोजी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 187 लोकल रद्द असणार
शनिवारी, 1 जून रोजी, 37 लांब पल्ल्याच्या आणि 534 लोकल रद्द असणार
रविवारी, 2 जून रोजी, 31 मेल एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द असणार
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
शुक्रवारी, 31 मे रोजी, 11 लांब पल्ल्याच्या तर 12 लोकल
शनिवारी, 1 जून रोजी, मेल एक्सप्रेस तर 326 लोकल
रविवारी, 2 जून रोजी, 18 मेल एक्सप्रेस आणि 114 लोकल