मुंबई
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती (Manusmriti) दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यमामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे.
आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात असे वंचितने म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध केला आहे.