21.1 C
New York

Loksabha Election : जम्मू काश्मीरने केला एक नवीन विक्रम

Published:

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलीय. फक्त एकाच टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया बाकी आहे. आत्तापर्यंत सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदान प्रक्रियेत जम्मू काश्मीरने (Jammu and Kashmi) एक नवीन विक्रम प्रस्थापीत केलाय. देशाच्या निवडणुकीच्या मतदानात जम्मू आणि काश्मीरने एक मोठी झेप घेतली आहे. गेल्या 35 वर्षातील सर्वात जास्त निवडणूक सहभागाची नोंद केली आहे.

Loksabha Election जम्मू काश्मीरमध्ये 35 वर्षात प्रथमच 58.46 टक्के मतदानाची नोंद

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातील ( लोकसभेच्या 5 जागांसाठी) मतदान केंद्रांवर 58.46 टक्के इतक्या एकत्रित मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीतील हा लक्षणीय सहभाग म्हणजे या प्रदेशातील जनतेच्या भक्कम लोकशाही भावनेचा आणि नागरी सहभागाचा एक पुरावा आहे. या केंद्रशासित प्रदेशात अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Loksabha Election जम्मू काश्मीरमध्ये ‘या’ पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश

2019 पासून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाल्याचे राजीव कुमार म्हणाले. सी-व्हीजिल तक्रारींवरून दिसणारा नागरिकांचा वाढता सहभाग तसेच सुविधा पोर्टलवर रॅली काढण्यासाठी विनंती करणारे 2455 अर्ज इ. द्वारे प्रतिबिंबित होत असलेला, साशंकतेपासून दूर जात एका निश्चित विश्वासाने, संपूर्ण सहभागाने निवडणुका आणि प्रचाराच्या अवकाशाकडे वळलेला कल याच्या आधारावर ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात मुख्यत्वे श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग राजौरी, उधमपूर आणि जम्मू या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

‘त्या’ पत्रावरून अजितदादा टिंगरेंवर भडकले

Loksabha Election बहुसंख्य मतदार हे 18 ते 59 या वयोगटातील

काश्मीर खोऱ्यातील तीन लोकसभा मतदारसंघात झालेले 50.86 टक्के मतदान लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित करत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केवळ 19.16 टक्के असलेल्या मतदानाच्या टक्केवारीत 30 अंकांच्या उसळीची नोंद झाली आहे. निवडणूक आयोग आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना या केंद्रशासित प्रदेशातील ऐतिहासिक प्रतिसादाचे श्रेय द्यावे लागेल. ज्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेच्या सक्षमीकरणासाठी, विशेषतः युवा वर्गाला या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. अधिकाधिक युवा वर्गानं त्यांच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा अंगिकार केला आहे. या मतदारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामधील बहुसंख्य मतदार हे 18 ते 59 या वयोगटातील आहेत.

दिल्ली, जम्मू आणि उधमपूर अशा विविध ठिकाणी मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरित मतदारांना देखील आयोगाने नामांकित विशेष मतदान केंद्रांवर मतदान करण्याची किंवा टपाल मतदानाच्या सुविधेचा वापर करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जम्मूमध्ये 21, उधमपूरमध्ये 1 आणि दिल्लीत 4 विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या क्षेत्रात स्वीपचा एक भाग म्हणून जागरुकता आणि संपर्कासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदानविषयक संदेशांचा प्रसार करण्यासाठी क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, जागरुकता मेळावे, पथनाट्ये आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img