नैऋत्य मोसमी (मान्सून) पाऊस भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) 2024 च्या हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) अद्ययावत दीर्घकालीन अंदाज केलाय. नैऋत्य मोसमी पाऊस (Monsoon) देशभरात सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2024 मधील मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2024 च्या नैऋत्य मोसमी (मान्सूनच्या) पावसाच्या हंगामाबाबतच्या (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या वार्ताहर परिषदेत विभागाने जून 2024साठी मासिक पाऊसमान आणि तापमानाचे भाकित देखील जारी केले आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी हा अंदाज सादर केलाय.
Monsoon दीर्घकालीन अंदाजाची वैशिष्ट्ये काय?
प्रमाणानुसार नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात ± 4% मॉडेल त्रुटीसह दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे 2024 मधील मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतावर मान्सूनचा पाऊस सामान्य सरासरीपेक्षा जास्त(>106 टक्के of LPA) राहण्याची आणि वायव्य भारतावर सामान्य (92-108 टक्के of LPA) आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (<94% टक्के of LPA) राहण्याची शक्यता आहे.
देशातील बहुतांश पावसावर आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सूनच्या गाभा क्षेत्रामध्ये (MCZ) नैऋत्य मोसमी हंगामाचा पाऊस बहुधा सामान्यपेक्षा जास्त (>106 टक्के of LPA) राहण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात दक्षिणी द्वीपकल्पीय भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात मासिक कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर दक्षिणी द्वीपकल्पीय भागात सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे.
आता सातबाऱ्यावर आईचंही नाव, सरकारचा मोठा निर्णय
Monsoon कुठे पडेल अधिक पाऊस?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्य राहील. तर पूर्व आणि ईशान्य भारतात जून-सप्टेंबर कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारताच्या दक्षिण द्वीपकल्पात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच LPA च्या 106 टक्क्यांपर्यंत नैऋत्य मान्सून हंगामात, मध्य भारत आणि पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, उत्तर-पश्चिम भारतात पाऊस सामान्य म्हणजेच एलपीएच्या 92 ते 108 टक्के अपेक्षित आहे आणि ईशान्य भारतात एलपीएच्या 94 टक्के म्हणजेच सामान्य पावसापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती होण्यास मदत झाली आहे, असे मोहपात्रा यांनी सांगितले.
Monsoon जूनमध्ये कसे असेल तापमान?
यंदा जून महिन्यातील तापमानाचा अंदाज पाहिल्यास, भारताच्या दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, देशाच्या बहुतेक भागांमध्ये मासिक कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. जून महिन्यातील किमान तापमान उत्तर-पश्चिम भारतातील सुदूर उत्तरेकडील भागात आणि पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे, तर मासिक किमान तापमान बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त असेल. जून 2024 मध्ये, वायव्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या सामान्यपेक्षा जास्त असेल .