26.6 C
New York

Hardik Pandya: हार्दिक-नताशा घटस्फोट? नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष!

Published:

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक मोठी अपडेट समोर आली आहे. कृणाल पांड्या हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य आणि मुलगा कवीर दिसत आहे. मात्र या फोटोवर नताशा स्टॅनकोविकने कंमेंट केली आहे. त्यामुळे सर्वत्र हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना कृणालने फोटो शेअर केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. नताशाचा वाढदिवस 4 मार्च रोजी होता. परंतु, वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही. तसेच नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. यावेळी नताशा आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तिने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही. अगोदर नताशा तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे.

अवनीत कौरने केला साखरपुडा? पोस्टमुळे चर्चेला उधाण!

नताशाची पोस्ट रंगली!
नताशाने इन्स्टाग्राम स्टोरीला वाहतूक चिन्हांचा फोटो ठेवला असून त्यावर कुणीतरी स्त्यावर येणार अशा आशयाचं इंग्रजी वाक्य ठेवलं होतं.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या २०१९ मध्ये पहिल्यांदा रिलेशनशिपच्या अफवा पसरवल्या. 1 जानेवारी 2020 रोजी दुबईच्या प्रवासादरम्यान हार्दिकने नताशाला प्रपोज केले तेव्हा त्यांचे नाते उघडकीस झाले. या जोडप्याने मे 2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान एका खाजगी समारंभात लग्न केले आणि त्याच वर्षी जुलैमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.

दरम्यान, २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या मागे संकटांची सिरीज सुरूच आहे. गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सकडे जाणे वादग्रस्त ठरले. मुंबई इंडियन्सने अचानक पांड्या कर्णधार म्हणून मुंबई फ्रँचायझीमध्ये परतला तर रोहित शर्माला कोणतीही सूचना न देता कर्णधारपदावरून हटवले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील या निर्णयाचा परिणाम झाला. तब्ब्ल एका तासात ट्विटरवर मुंबई इंडियन्सचे 400,000 फॉलोअर्स कमी झाले. तेव्हापासून पांड्याच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या कामगिरीवर टीका होत आहे.

आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा पांड्या भाग आहे. त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. याआधी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पांड्याला तेवढीच रक्कम द्यायचा. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. मुंबईत हार्दिक पांड्याने एक अपार्टमेंट घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासोबतच त्यांचे वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img