15.3 C
New York

Ghatkopar hording: आयपीएस कैसर खालिद यांना लवकरच समन्स

Published:

मुंबई
घाटकोपर होर्डिंग (Ghatkopar hording) दुर्घटनेप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीने तपासाला वेग दिला आहे. रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांची मंगळवारी चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आला. एसआयटीने यावेळी निकम यांच्याकडून कडून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्या कागदपत्रांची शहानिशा कटण्यात येत आहे. घाटकोपर येथे १३ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळले होते. या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी युगो कंपनीचे भावेश भिंडेसह इतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. फरार भावेशला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या तो पोलीस कोठडीत आहे. होर्डिंग्जसाठी युगो कंपनीला रेल्वे पोलिसांकडून परवानगी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

या जाहिरात कंपनीचा मालक भावेश हा रेल्वे पोलिसांना दादर आणि घाटकोपर येथील होर्डिंगसाठी दरमाह तीस लाख रुपये देत होता अशी माहिती चौकशीत उघडकीस येताच रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मंगळवारी शहाजी निकम यांची चौकशी करण्यात आली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूरसह इतर पोलीस अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसाठी कधी परवानगी देण्यात आली, त्याचप्रमाणे कागदपत्रांवर कोणत्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षर्‍या होत्या. या होर्डिंगला परवानगी देताना नियमांचे पालन झाले होते का?, तसेच होर्डिंग उभारण्यात आलेले बांधकामाविषयी रेल्वे पोलिसांना माहिती होती का?, याबाबतही चौकशी करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त शहाजी निकम यांनी या प्रकरणात काही कागदपत्रे सादर केली असून त्याची एसआयटीचे अधिकारी शहानिशा करत आहेत. याच प्रकरणात रेल्वेचे तत्कालिन पोलीस आयुक्त खालिद कैसर यांचीही लवकरच चौकशी होणार असल्याचे समजते. एसआयटी लवकरच त्यांना समन्स पाठवणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img