3.1 C
New York

Avneet Kaur: अवनीत कौरने केला साखरपुडा? पोस्टमुळे चर्चेला उधाण!

Published:

अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) कायम तिच्या बोल्ड लुक आणि कामामुळे चर्चेत असते. तिने वयाच्या नवव्या वर्षापासूनच तिच्या करिअरची सुरूवात केली. ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’च्या २०१० च्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. दोन वर्षानंतर डान्सर अवनीतने अभिनय क्षेत्रासाठीची वाटचाल सुरू केली. २०१२ मध्ये सुरु झालेल्या ‘मेरी मॉं’ या मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिज तसेच म्युझिक व्हिडीओ करत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.


तिने एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलंय. नुकतीचं अवनीतने कान्स फिल्म फेस्टिवललादेखील हजेरी लावली होती. अशातच अवनीतने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. मिनिमल मेकअप आणि तिच्या मॅचिंग नेल आर्टने तिने हा लूक पूर्ण केलाय. पण अवनीतच्या अंगठीने चाहत्यांच लक्ष वेधलं. पोस्ट केलेल्या दोन्ही फोटोमध्ये अवनीत तिची अंगठी दाखवतेय यामुळेच अवनीतचा साखरपुडा झालाय की काय या चर्चांना उधाण आलंय.

लव्हर्स डे निमित्त ‘हा’ चित्रपट केवळ ९९ रुपयात!


२२ वर्षांची अवनीत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. त्यामुळे अभिनय क्षेत्रासोबतच वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिने केलेल्या पोस्टमुळे अभिनेत्रींच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. अवनीतने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की, “चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. मी या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.” तिने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. दरम्यान, अवनीत कौर नक्की कोणती आनंदाची बातमी देणार हे चाहत्यांना लवकरच कळेल. अवनीत ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे नुकताच अनावरण करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img