3.8 C
New York

Eknath Shide : मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांनी कायदेशीर नोटीस (Legal Notice) बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फ संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस (Defamation Notice) पाठवण्यात आली आहे. तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच या नोटीसमधून देण्यात आला आहे. ही नोटीस राऊतांनी सोशल मीडियावर शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. हे एक मजेशीर राजकीय पत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून रोखठोक भूमिका मांडली होती. यावेळी, त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना, महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता एकनाथ शिदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

संजय राऊत यांनीही नोटीसवर बोलताना म्हटले की, गैरसंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला एका कायदेशीर नोटीस बजावली आहे. अतिशय मनोरंजक आणि अनेक हास्यास्पद राजकीय दस्तावेजांपैकी हा एक म्हणत संजय राऊत यांनी या नोटीसची खिल्ली उडवल्याचंही दिसून येत आहे. तसेच, अब आयेगा मजा.. असेही राऊत यांनी नोटीसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img