21 C
New York

Pune Accident :‘त्या’ पत्रावरून अजितदादा टिंगरेंवर भडकले

Published:

पुण्यातील कार अपघाताचं प्रकरणात रोज धक्कादायक (Pune Accident) खुलासे होत आहेत. या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे सुद्धा अडचणीत आले आहेत. त्यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून डॉ. अजय तावरे यांची शिफारस केली होती. त्यानंतर डॉ. तावरे यांची ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महायुती सरकारमधील अजित पवार (Ajit Pawar) चांगलीच कोंडी झाली आहे. स्वतः अजित पवारही नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना चांगलेच खडसावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Pune Accident सुनील टिंगेरेंच्या पत्रात काय?

गुन्हे शाखेने अटक केलेल्या डॉ. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे केली होती. त्यानंतरच अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या शिफारसीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

संजय शिरसाठ यांचा सुषमा अंधारेला टोला,म्हणाले

आमदार सुनील टिंगरे यांच्या या शिफारस पत्रावर विनंतीप्रमाणे अतिरिक्त कारभार त्यांना देण्यात यावा. नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकर्ष पूर्ण करत नाही, असा शेरा तत्कालीन वै हसन मुश्रीफ यांनी या पत्रात दिला होता. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी 26 डिसेंबरला मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते तर 28 डिसेंबरला वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी शेरा दिला होता.

आता हेच पत्र अजित पवार गटाची कोंडी करत आहे. विरोधी पक्षांनी महायुती सरकारला या प्रकरणात कात्रीत पकडलं आहे. या प्रकरणात ज्या पद्धतीने खुलासे होत आहेत त्यातून सरकारी व्यवस्थेचा अनागोंदी कारभारच बाहेर आला आहे. त्यात आता सत्ताधारी पक्षातील आमदारानेच डॉक्टराची नियुक्तीसाठी शिफारस करण्यासाठी लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाले असून त्यांनी आमदार सुनील टिंगरेंची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img