15.3 C
New York

Sangli Accident : बर्थ-डे सेलिब्रेशन करून परतताना अपघात; 6 ठार

Published:

सांगली जिल्ह्यातून धक्कादायक बातमी…तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री अल्टो (Sangli Accident) कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू या अपघातात झाला आहे. तर एक महिला गंभीर आहे. हा भीषण अपघात रात्री साडेबाराच्या दरम्यान झाला. ऑल्टो कार थेट यावेळी तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. कॅनॉल पाणी नसल्यामुळे हा कोरडा होता. ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. कर चालकाला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.

Sangli Accident चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. हे तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत झाला. कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

दुष्काळी भागाची पाहणीकरिता काँग्रेसकडून समिती स्थापन

Sangli Accident कारचे बोनेट आणि पुढचा भाग यामध्ये पूर्णपणे चेपला

रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही जखमी अवस्थेत पहाटेपर्यंत पडून राहिले या दुर्घटनेबद्दल मनाला वेदना देणारी आणखी माहिती समोर आली आहे. कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. कारचे बोनेट आणि पुढचा भाग यामध्ये पूर्णपणे चेपला गेला आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img