23.1 C
New York

Western Railway : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली

Published:

पालघर

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात झाला आहे. या मालगाडीवरुन वाहतूक करण्यात येणारे स्टील कॉईल रोल रुळावर पडले आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे पाच ते सहा डबे रुळावरून घसरल्याने ते पलटी झाले. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावित झाले आहेत. तर प्रशासनाकडून बचावकार्य केले जात आहे. तर पुढील दोन ते तीन तास येथील वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईनवर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img