19.7 C
New York

Water shortage : पाण्यासाठी वणवण; भाजप मंत्री म्हणतात…

Published:

दुष्काळाच्या झळा फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही बसतात. देशातील अनेक भागांच्या पाचवीलाच हा दुष्काळ पुजलेला आहे. हा दुष्काळ नाहीसा होईल की नाही माहती नाही. मात्र, कुठतरी कमी होईल यासाठी अनेक योजना आल्या आणि इतिहासजमा झाल्या. परंतु, दुष्काळाचं सावट मात्र काही हटलं नाही. अशा दुष्काळाच्या काळात एकदा अजित पवार यांनी धरणाच्या अनुषंगाने एक विधान केलं होतं. त्यांच्या विधानाने देशभरात मोठा गदारोळ झाला होता. (Water shortage) तसंच, अनेकदा त्यांच्या विधानबद्दल स्वत: अजित पवारच मोठी चूक झाली म्हणून बोलत असतात. आता अशाच आशयाचं भाजप नेत्याने एक विधान केलं आहे, ज्याची देशभर चर्चा आहे.

Water shortage मी फुक मारुन पाणी कसे आणू?

पाण्यावरुन राजस्थानमध्ये महाभारत होत असताना राजस्थानचे मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी फुक मारुन पाणी घेऊन येऊ, वा हनुमानसारखं लागलीच पाणी आणू, असं शक्य नाही’, असं विधान त्यांनी केल आहे. जितकं पाणी आहे, तितका पुरवठा करण्यात येत असल्याचही ते म्हणाले. लोकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

‘या’ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन

Water shortage नागरिकांचा संताप

देशात तापमानाचा पारा रोज वाढतोय. सध्या राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट आलंय. त्याचबरोबर राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 50 अंशांच्या घरात गेल्याने मृत्यूचं प्रमाणही वाढलय. येथील अनेक शहरात पाणी पुरवठा नियमीत होत नाही. भर उन्हाळ्यात नळांना पाणी येत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे सरकार पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत आहे. पण पिण्याचे पाणीच पिळत नसल्याची नागरिकांची ओरड होत आहे.

Water shortage कारवाई होणार

यंदा राजस्थानमध्ये तापमानाने कहर केलाय. उष्णतेने अनेकांचे मृत्यू ओढावले आहेत. याकाळात पाण्याची नासाडी करताना कोणी आढळला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चौधरी यांनी दिला. जिथे पिण्याच्या पाण्याची गरज आहे, तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचही ते म्हणाले. दरम्यान, येथे रविवारी उष्णतेमुळे एकाचा मृत्यू झाला. सोमवारी फलोदीत तापमान 49.4 डिग्री सेल्सिअसवर पोहचलं. बाडमेरमध्ये 49.3 डिग्री, जेसलमेरमध्ये 48.7 डिग्री, पिलानीमध्ये 48.5 डिग्री, करोलीमध्ये तर, 48.4 डिग्री तापमान आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img