23.1 C
New York

Pune Accident : पुण्यात ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

Published:

पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघाताचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच पुण्यात आणखी एक भीषण अपघात (Pune Accident) घडला आहे. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दोन महाविद्यालयीने तरुणांचा मृत्यू झाला आहे. मयत युवक लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वाघोलीत ते शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचालक त्याचा ट्रक घेऊन चंदननगरच्या दिशेने जात होता. त्यावेळी जकात नाका येथील सिग्नलवर एक दुचाकी थांबली होती. या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवरील तिघे जण फरपटत गेले. यातील दोघा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही – भुजबळ

Pune Accident रोजच नवनवीन खुलासे

पुण्यातील पोर्शे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतली. त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. तसेच आरोपीचे वडिल आणि आजोबालाही अटक करण्यात आली. या अपघाताने देशभरात खळबळ उडाली. या अपघात प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यात हा आणखी एक मोठा अपघात झाला आहे.

ट्रकने फरपटत नेल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. या जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एकूणच वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने रस्ते अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. दुचाकींची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहतूक कोंडीही सातत्याने होत आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनेही शहरात सर्रास प्रवेश करत आहेत. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img