4 C
New York

Sushma Andhare : फडणवीस नापास गृहमंत्री – सुषमा अंधारे

Published:

पुणे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य प्रशासन, लोकप्रतिनिधी असे किती लोक आणि किती मोठी यंत्रणा ही एका मुलाला वाचवण्यासाठी कामाला लागली आहे, असा आरोप सुषमा अंधारेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला.गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा किती पोखरली गेली आहे, त्याचे उत्तम उदाहरण हे पुणे हिट अँड रन केस असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, ड्रग्जचा मुळ डिस्ट्रिब्यूटर, एजंट, पेडलर, यांची पूर्ण यंत्रणा ससूनमधून कार्यरत होती. यामध्ये ससूनेच आधीचे डीन संजीव ठाकूर यांच्यापासून वॉर्ड बॉय, सफाई कामगारापर्यंत सर्व बरबटलेले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. यासाठी सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. राज्याला एवढा अकार्यक्षम गृहमंत्री कधीही लाभलेला नव्हता, असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला. महाराष्ट्राचे नापास झालेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img