4 C
New York

Sonia Doohan : सोनिया दुहान शरद पवार गटाची साथ सोडणार

Published:

नवी दिल्ली

शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान (Sonia Doohan) लवकरात अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड झाल्यानंतर दुहान यांनी शरद पवार यांची सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत शरद पवार (Sharad Pawar) गट सोडणार असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे.

सोनिया दुहान म्हणाल्या की, मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर, ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रिया सुळेही लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील.

सोनिया दुहान म्हणाल्या की, शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. पण, त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या.केवळ सेल्फी काढून पक्ष चालत नाही, असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत. मी लवकर पक्ष जोडण्याचा निर्णय येईल, मी सध्या इतर कोणता पक्ष जॉइन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोक त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असंही सोनिया दुहान म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img