15.3 C
New York

Kirti Vyas Case : कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना जन्मठेप

Published:

मुंबईतील बहुचर्चित किर्ती व्यास हत्याप्रकरणात (Kirti Vyas Case) सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि कविता सजलानी (बदलेलं नाव – न्यायालयाच्या आदेशानुसार) आरोपीचं बया दोघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांपूर्वीच्या या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना अद्याप किर्तीचा मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडले नाहीत. मात्र गुन्हे अन्वेशन विभागाने न्यायालयासमोर काही डिजीटल आणि फॉरेन्सिंक पुरावे सादर केले. हे पुरावे पुरेसे असल्याचं म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींना या खून प्रकरणात दोषी घोषित केलं आहे. 16 मार्च 2018 रोजी किर्ती व्यासचा खून झाला होता. मे 2018मध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर तीन महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणी चार्जशीट दाखल केली. कविता सजलानी हिला 2021मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सिद्धेश ताम्हणकर अद्यात तुरुंगात आहे.

Kirti Vyas Case असा केला युक्तिवाद

मात्र चिमलकर यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढले आणि ही हत्या अत्यंत थंड डोक्यानं करण्यात आल्याकडं न्यायालयाचं लक्ष वेधलं. कीर्ती व्यास देखील तिच्या कुटुंबियांचा एकमेव आर्थिक आधार होती, असा युक्तिवाद केलाय. पूर्ण खटल्यादरम्यान सिध्देशला जामीन मिळाला नाही. तर खुशीला 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. सोमवारी तिला दोषी ठरवण्यात आल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं

तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, गुन्हे अन्वेशन विभागाचे प्रमुख संजय सक्सेना, सहआयुक्त के. एम. प्रसन्ना हे सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना खुसी सजलानीच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारमध्ये रक्ताचे काही डाग सापडले. फॉरेन्सिकने त्याची तपासणी केली असता त्यांच्या लक्षात आलं की, हे किर्तीच्या रक्ताचे डाग आहेत. त्यानंतर पोलिसांनी कविताची चौकशी सुरू केली. खुशीच्या जबानीत सिद्धेश ताम्हणकरचा उल्लेख आल्यावर पोलिसांनी सिद्धेशला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली.

किर्ती व्यास अंधेरी येथे बी ब्लंट या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. एक बॉलिवूड अभिनेता या कंपनीशी संबंधित आहे. कविता सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे याच कंपनीत काम करत होते. खुशी आणि सिद्धेशचं अफेयर चालू होतं. सिद्धेश कार्यालयात चांगलं काम करत नव्हतं. अशातच केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली लागू केली. मात्र सिद्धेशला त्यातलं फारसं ज्ञान नव्हतं. तसेच जीएसटीबाबात शिकण्यात त्याला रस नव्हता. त्यामुळे किर्तीने सिद्धेशला नोटीब बजावली. ज्या दिवशी किर्तीचा खून झाला तो सिद्धेशला बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दिलेल्या मुदतीची शेवटचा दिवस होता. सिद्धेशला नोकरी गमावण्याची भीती होती.

पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट

Kirti Vyas Case मृतदेह चेंबूरमधील माहुल गावातील एका नाल्यात

१६ मार्च रोजी सिद्धेश आणि खुशी मुंबईतील डी. बी. मार्ग परिसरात गेले होते. किर्ती या परिसरात हात होती. किर्ती ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली त्याचवेळी सिद्धेश आणि खुशीने तिला काही कारण सांगून खुशीच्या कारमध्ये बसवलं. कार सुरू झाल्यावर किर्तीवर त्या दोघांनी सिद्धेशला पाठवलेली नोटीस मागे घेण्यास सांगितलं. किर्तीने त्यास नकार दिल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर किर्तीचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेवण्यात आला. खुशीने ही कार परळ भागात नेली. सिद्धेत तिथे कारमधून उतरला आणि तिथून ऑफिसला गेला. तर खुशी किर्तीचा मृतदेह असलेली कार घेऊन सांताक्रुझला तिच्या घराकडे गेली. इमारतीच्या पार्किंगमध्ये कार उभी करून खुशीदेखील ऑफिसला गेली. सायंकाळी सिद्धेश आणि खुशी एकामागोमाग ऑफिशमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघांनी खुशीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार घेतली आणि चेंबूरला गेले. त्यांनी किर्तीचा मृतदेह चेंबूरमधील माहुल गावातील एका नाल्यात फेकला.

Kirti Vyas Case या खून प्रकरणाचा गुंता सुटला.

त्याच दिवशी रात्री किर्तीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. त्या दिवशी बी ब्लंट कंपनीतील किर्तीचे अनेक सहकारी पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्याबरोबर सिद्धेश आणि खुशीदेखील पोलीस ठाण्यात गेले. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी किर्तीचं घर, इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, 16 मार्च रोजी किर्ती आमच्या कारमध्ये होती. आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ सोडलं. कारण ती रेल्वेने ऑफिसला जात होती. रेल्वेस्टेशन आणि आसपासच्या कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये किर्ती दिसली नाहीच. त्यामुळे पोलिसांनी खुशीच्या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करून घेतली. फॉरेन्सिकमधील पथकाला खुशीच्या कारमध्ये किर्तीच्या रक्ताचे डाग सापडले आणि तिथून या खून प्रकरणाचा गुंता सुटला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img