७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मुंज्या’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) केलं आहे. मात्र या सिनेमातील एका गाण्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ (Sharvari Wagh) या चित्रपटात झळकणार आहे. मुंज्या सिनेमात शर्वरी आयटम साँगमध्ये दिसणार आहे. तिच्या या बोल्ड लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमातील आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या बोल्ड लूकमुळे तिने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. स्त्री आणि भेडियानंतर मॅडॉक फिल्म्सकडून पुन्हा एकदा नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 7 जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोकणाती मुंज्या या भूतावर सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज या कलाकारांचा समावेश आहे. मॅडॉक फिल्म्स प्रोडक्शन, मुंज्याची निर्मिती विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे.
ट्रेनमध्ये ‘या’ अभिनेत्रीला केली मारहाण!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ आहे. ‘द फरगॉटन आर्मी- आझादी के लिये’ या वेबसिरिजमधून शर्वरीने अभियनच्या कारकिर्दीला सुरुवात केली. याआधी ती लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. ‘मुंज्या’ चित्रपटात ती एका आयटम सॉंगमध्ये झळकणार आहे. प्रेक्षकांनी तिच्या लुक पाहून कंमेंट्सचा पाऊस पडला.