Divya Agarwal : देखण्या पतीपासून घेणार घटस्फोट दिव्या अगरवाल ? फोटो डिलीट केल्यानंतर स्टोरी शेअर करत म्हणाली…
Divya Agarwal : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ (Big Boss OTT) शो ची विजेती दिव्या अगरवालने (Divya Agarwal) २० फेब्रुवारी २०२४ रोजी बॉयफ्रेंडसोबत महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नगाठ बांधली. पण आता अवघ्या ३ महिन्यातच या दोघांच्यात फूट पडल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. नुकतेच दोघेजण हहनिमूनला गेले होते. हनीमूनवरून परतताच दोघांनीही इंस्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे सर्व फोटो डिलीट करून टाकले आहेत. तर दिव्याने अपूर्वसोबतचे लग्नाचेदेखील फोटो उडवून टाकले आहेत. दिव्याच्या इंस्टाग्राम फिडवर फक्त तिच्या खासगी फोटोशूटचे आणि इतर काही प्रोजेक्टबद्धल संबंधित पोस्ट दिसत आहेत. त्यामुळेच दोघांमध्ये काहीतरी वाजलंय असं म्हंटल जातंय. तर दुसरीकडे हा पीआर स्टंट असल्याचंही म्हंटल जातंय. अपूर्वने सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिव्यासोबतचे लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. तर इतर काही पोट इन्स्टा फिडवर दिसण्यात येत आहेत.
एक था राजा, एक थी राणी… खत्म कहानी” ‘धडक २’ ची घोषणा!
मात्र आता दिव्या अगरवालने (Divya Agarwal) मौन सोडलंय इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलंय की, “मी काहीच बोलली नाहीये. आणि मी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये. मी अकाउंटवरच्या २५०० पोस्ट डिलीट केल्या आहेत. पण मीडियाने फक्तच लग्नाचे फोटो न दिसण्यावरच प्रतिक्रिया दिल्या. बाकीचे लोक यासर्वांकडे कस पाहतात आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे पाहणं रंजक ठरतंय. मी नेहमीच ते केल आणि करतेय जे लोकांना अपेक्षित न्हवतं. आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत – घटस्फोट की बाळ ? खरं तर यामधलं काहीच नाही.”
दिव्याने पुढे लिहिलं की, “खरं तर आता मला फक्त माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टबद्धल बोलायला आवडेल. प्रत्येक कथेचा शेवट आनंदी असतो आणि देवाच्या कृपेने माझे पती माझ्या शेजारी शांतपणे झोपले आहेत आणि घोरत आहेत.” अशी स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर करतदिव्याने घटस्फोटाच्या चर्चाना फूलस्टॉप दिला आहे. इंस्टाग्रामवरच्या २५०० पोस्ट डिलीट केल्या आहेत त्यांपैकी काही फोटो लग्नाचे व पती अपूर्वसोबतचे होते, असं दिव्याने म्हंटल आहे.
दिव्या अगरवाल (Divya Agarwal) आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर (Apurv Padgoankar) यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी दिव्याच्या चेंबूर येथील घरी लग्नगाठ बांधली होती. दोघांनी सुद्धा इंस्टाग्रामवर लग्नाचे बरेच फोटो शेअर केले होते. दिव्या आणि अपूर्वने एंगेजमेंट केल्यापासून अनेक एकमेकांसोबतचे फोटो आपल्या अकाउंटवर पोस्ट केले होते, मात्र आता त्यांनी सर्व फोटो डिलीट केले आहेत. दोघांचाही एकमेकांसोबतचा एकसुद्धा फोटो इंस्टाग्रामवर न दिसल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. लग्न केलं आणि अवघ्या ३ महिन्यातच या दोघांमध्ये फुटाफूट झाली असल्याचं चर्चाना उधाण आलं, मात्र तस काहीच नसल्याचं चोखं स्पष्टीकरण दिव्या अगरवालने दिलं आहे.
अशातच, दिव्या आणि अपूर्व काही दिवसांपूर्वीच एकत्र एक कार्यक्रमाला गेले होते, त्याठिकाणचे दोघांचे फोटो आणि व्हिडिओ खूप चर्चेत होते. मात्र त्यांनी फोटो उडवल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. पण तसं काहीही नसल्याचं दिव्याने स्पष्ट सांगितलं आहे.