लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) अंतिम आणि सातव्या टप्प्यातील मतदान (Voting) पुढील 1 जून रोजी होत असून आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात पहिल्या 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशसह 8 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात त्यानंतर, सहाव्या टप्प्यात मतदान झाले.मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला.
देशातील लोकसभा निवडणुकीत सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. सातवा आणि शेवटचा टप्पा आता १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचे जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान भाजप विजयाचं मोठं भाकित केलं आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेश राज्य बालेकिल्ला राहिलं आहे. मध्य प्रदेश कर्नाटक, गुजरात, राजस्थान प्रमाणेच यूपीतून भाजप उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतात. यंदाही या राज्यांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा आहेतच. परंतु, मोदींनी एका वेगळ्याच राज्याचा उल्लेख केला आहे जिथे भाजपाचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यातच, सर्वाधिक जागा कोणत्या राज्यातून मिळतील, यावर भाष्य केलं आहे.त्यामध्ये, ना युपी, ना महाराष्ट्र तर प. बंगालचंच (West Bengal) नाव मोदींनी घेतलं आहे.
भुजबळांवर निलेश राणे भडकले; म्हणाले
Loksabha Election मतदानाची टक्केवारी वाढली
पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात मतदान होत असून गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा प.बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्वच टप्प्यात 76 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करत प. बंगालच्या मतदारांनी उत्साह दाखवला आहे. संदेशखाली, ओबीसी आरक्षण, शिक्षक भरती घोटाळा आणि नंदीग्राम हिंसा यांसारख्या मुद्द्यांवर येथील निवडणूक चर्चेत होती. मात्र, मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवत निवडणुकीत सहभाग घेतल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे 4 थ्या टप्प्यात राज्यात 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे.
Loksabha Election 10 जूनला ओडिशात शपथविधी
प्रधानमंत्री मोदींनी ओडिशातील विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केलं. मोदी म्हणाले, आता ओडिशाचं भाग्य बदलणार आहे. कारण येथील सरकार बदलणार आहे. मी म्हटलंय की ओडिशा सरकारचा कार्यकाळ ४ जूनपर्यंतच आहे. यानंतर १० जूनला राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.